Sankarshan Karhade: मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता  संकर्षण कर्‍हाडे (Sankarshan Karhade) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. संकर्षणनं अनेक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तो कवी देखील आहे. अनेक वेळा संकर्षण त्यानं लिहिलेल्या कविता प्रेक्षकांसमोर सादर करतो. संकर्षण हा अष्टपैलू कलाकार आहे असं म्हणता येईल, कारण संकर्षण हा कवी, अभिनेता आणि दिग्दर्शक या भूमिका उत्तमपणे पार पडतो. जाणून घ्या संकर्षण कर्‍हाडेच्या नाटक, मालिका आणि चित्रपटांबद्दल...
 


मालिकेमधून केलं मनोरंजनसृष्टीत पदार्पण 


संकर्षण हा परभणीचा आहे. 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' हा संकर्षणचा डायलॉग फेमस आहे. 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या आभास हा या मालिकेच्या माध्यमातून संकर्षणनं अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं 2012 मध्ये मला सासू हवी या मालिकेत काम केलं. 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'खुलता कळी खुलेना' या मालिकेत देखील संकर्षणनं काम केलं. माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेत संकर्षणनं साकारलेल्या समीर या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


'या' चित्रपटांमध्ये केलं काम


मालिकांबरोबरच संकर्षणनं  काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 2016 मध्ये त्यानं नागपूर अधिवेशन या  चित्रपटात काम केलं. त्यानं वेडिंग चा शिनेमा या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॉमेडी चित्रपटात दिलीप शहाणे ही भूमिका साकारली.  


नियम व अटी लागू, तू म्हणशील तसं या नाटकांमध्ये संकर्षणनं काम केलं. संकर्षणनं  'सारखं काहीतरी होतंय' या नाटकाचं लेखन आणि  दिग्दर्शन केलं आहे.संकर्षणच्या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षक गर्दी करतात.  “संकर्षण via स्पृहा” हा संकर्षणचा कार्यक्रम देखील गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.






संकर्षण हा त्याच्या कवितांचे व्हिडीओ देखील शेअर करत असतो. संकर्षणच्या कवितांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sankarshan Karhade : चालकाची तब्येत बिघडली, मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बनला बस ड्रायव्हर, प्रशांत दामले म्हणाले...