Movies Releasing in July 2023 : आजपासून जुलै (July) महिना सुरू झाला असून या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जुलै महिन्यात करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Or Rani Ki Prem Kahani) या सिनेमापासून ते '72 हुरैं'पर्यंत अनेक बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे. यात प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स, कौटुंबिक, विनोदी, थरार, नाट्य असणाऱ्या सिनेमांचा समावेश आहे. 


इनसिडियस द रेड डोर (Insidious The Red Door) 
कधी प्रदर्शित होणार? 7 जुलै


जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच इनसिडियस द रेड डोर (Insidious The Red Door) हा हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा इंग्लिशसह हिंदी, तेलुगू आणि तामिळ या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.


नीयत (Neeyat)
कधी प्रदर्शित होणार? 7 जुलै


'नीयत' हा सिनेमा येत्या 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विद्या बालन, राहुल बोस आणि अमृता पुरी मुख्य भूमिकेत आहेत. 


72 हूरें (72 Hoorain)
कधी प्रदर्शित होणार? 7 जुलै


वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 72 हूरें हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. संजय पूरन सिंहने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.






मिशन इंपोसिबल पार्ट 7 (Mission: Impossible – Dead Reckoning)
कधी प्रदर्शित होणार? 12 जुलै


मिशन इंपोसिबल पार्ट 7 (Mission: Impossible – Dead Reckoning) हा सिनेमा 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टॉम क्रूजसह अनेक सुपरस्टार झळकणार आहेत. 


अजमेर (Ajmer 92)
कधी प्रदर्शित होणार? 14 जुलै


अजमेर (Ajmer 92) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पुष्पेंद्र सिंह दिग्दर्शित या सिनेमात राजेश शर्मा आणि अल्का अमीन मुख्य भूमिकेत आहेत. 


रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky aur Rani ki Prem Kahani)
कधी प्रदर्शित होणार? 28 जुलै


करण जोहरचा बहुचर्चित रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky aur Rani ki Prem Kahani) हा सिनेमा 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन अशी तगडी स्टारकास्ट आहे. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!