Bhumi Pednekar : आपण केलेल्या कामाचे कौतुक सगळ्यांनी करावे अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते. त्यातही जवळच्या व्यक्तींनी कुटुंबीयांनी दिलेल्या कौतुकाची थाप आणखी महत्त्वाची असते. काहीजण या कामाचे कौतुक करण्यासाठी विशेष भेटवस्तू देतात. 'भक्षक' या (Bhakshak Movie) चित्रपटात दमदार परफॉर्मन्स दिलेल्या भूमी पेडणेकरचे (Bhumi Pednekar) कौतुक तिची आई खास भेटवस्तू देऊन करते.  भक्षक चित्रपट पाहून आई भावूक झाली. या कामासाठी तिने लेक भूमीला गिफ्ट दिले.


'भक्षक'मधील  दमदार अभिनयासाठी भूमीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपट समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनीदेखील तिच्या कामाला दाद दिली आहे. भूमी पेडणेकरच्या आईलाही तिने केलेले काम भावले आहे. भक्षक चित्रपट पाहून भूमी पेडणेकरच्या आईला भावना अनावर झाल्या. लेकीने दिलेल्या दमदार परफॉर्मन्ससाठी आईने भूमीला खास गिफ्ट दिले आहे. भूमी पेडणेकरने हा किस्सा सांगितला. 


भूमीने सांगितले की, माझी आई माझी सर्वात मोठी टीकाकार ही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मी एखादा प्रोजेक्ट करतो तेव्हा मी तिच्या रिव्युची वाट पाहते. ती खुप  प्रामाणिक आहे आणि तिने मला वेळोवेळी सर्वात चांगला अभिप्राय दिला आहे.  


भूमीने सांगितले की,  “चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्याकडे पाहून मलाही रडू आले. मला 'माझ्या दम लगा के हैशा' क्षणाची आठवण झाली. मी माझ्या आईला इतके भारावलेले कधी पाहिले नाही. घरी परतताना आम्ही अजिबात बोललो नाही. मला वाटते की तिने जे पाहिले ते तिला खोलवर स्पर्श करुन गेले होते. 






आईने दिले खास गिफ्ट 


भूमीने पुढे म्हटले की,  जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आईने माझ्या कामाचे कौतुक केले आणि  मला एक सोन्याचे नाणे मिळाले. आईची ही कौतुकाची थाप माझ्यासाठी महत्त्वाची असल्याचे भूमीने सांगितले. माझ्याकडून आता सोन्याची 7 नाणी आहेत आणि आईकडून झालेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा महत्त्वाचे असल्याचे भूमीने सांगितले. 


'भक्षक' चित्रपटात अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. भूमी पेडणेकरशिवाय संजय मिश्रा, सई ताम्हणकर आदींच्या  प्रमुख भूमिका आहेत.