संजय दत्तचं पुनरागमन, बापलेकीच्या नात्यावरील 'भूमी'चा ट्रेलर
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2017 06:42 PM (IST)
अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे.
मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचं पुनरागमन असलेला 'भूमी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ओमांग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बाप-लेकीच्या आयुष्यात आलेल्या एका वादळाची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी 'भूमी'च्या टायटल रोलमध्ये आहे, तर संजय दत्त अरुण ही भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक शेखर कपूरही या सिनेमात दिसणार आहेत. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे. बापलेकीच्या नात्याचा एक वेगळा पैलू सिनेमात उलगडेल.