Bhool Bhulaiyaa 2 Manjulika Returns : अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2007 साली प्रदर्शित झालेल्या भुलभलैया या चित्रपटात विद्या बालनने मंजुलिकाचे पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. मंजुलिकाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता पुन्हा एकदा  त्याच व्यक्तिरेखेसह विद्या बालन मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.


2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनने मंजुलिकाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 14 वर्षे झाली असली तरी आजही हा चित्रपट आणि त्यातील सर्व पात्र लोकांच्या मनात ताजे आहेत. त्यामुळे लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'भूल भुलैया 2' या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यन दिसणार आहे. यात कार्तिकसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू देखील दिसणार आहेत. भुलभुलैया 2 या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. सिनेमाचे दिग्दर्शक अनीस म्हणाले,"चित्रपटातील मंजुलिका हे पात्र माझे आवडते आहे. विद्या बालन भुलभुलैया 2 या चित्रपटातदेखील दिसेल". 


'भूल भुलैया 2' येत्या 25 मार्च 2022 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भूल भुलैया 2 चा टीजर प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट हॉरर-कॉमेडीचा दुहेरी संगम असेल. चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि सायनी आहूजा हे प्रमुख भूमिकेत असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. याआधी चित्रपटाचे तीन पोस्टर 19 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. कार्तिक, कियारा आणि तब्बू या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यादांच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत. 


संबंधित बातम्या


Hrithik Roshan : ठरलं! ऋतिक रोशन 'विक्रम वेधा'चा खलनायक, 'या' दिवशी होणार पहिला लूक प्रदर्शित


Ramesh Babu Death :साऊथ सुपरस्टार महेश बाबूंच्या मोठ्या बंधूंचं निधन, टॉलिवूडमध्ये पसरली शोककळा !


26 वेळा फोन केला, पण बॉयफ्रेंडने उत्तर दिले नाही ; Urfi Javed ने  सांगितला किस्सा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha