Ramesh Babu Death : चित्रपट निर्माते आणि साऊथचे सुपरस्टार महेश बाबू यांचे मोठे बंधू रमेश बाबू गरू यांचं निधन झालं आहे. रमेश बाबू हे दिर्घकाळापासून आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रमेश बाबू हे साऊथ सुपरस्टार कृष्णा यांचे मोठे चिरंजीव होते. रमेश बाबू यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. साऊथ सुपरस्टार पवन कल्याणसह अनेक मोठमोठ्या कलाकारांनी रमेश बाबूंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 


रमेश बाबू यांचे निधन अशा वेळेस झाले ज्यावेळेस महेश बाबू हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. महेश बाबू यांनी 7 जानेवारीला स्वत: ट्विट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. दरम्यान रमेश बाबू यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर दिग्दर्शक रमेश वर्मा यांनी 'इथे मी स्तब्ध आहे. रमेश बाबू गरू आता नाही राहिले. कृष्णा गरू आणि महेश बाबू  गरू यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती'. अशा शब्दांत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 


तर दुसरीकडे चित्रपट निर्माते बीए राजू यांनी 'अत्यंत दु:खाने आम्ही जाहीर करत आहोत की आमचे लाडके रमेश बाबू गरू यांचे निधन झाले आहे. ते नेहमीच आमच्या हृद्यात जिवंत राहतील. तसेच आम्ही आमच्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की त्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे आणि स्मशानस्थळी जमणे टाळावे. अशा शब्दांत ट्वीट करत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच हितचिंतकांना विनंती केली आहे. 


जाणून घ्या रमेश बाबू यांच्याविषयी :
साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांच्याप्रमाणेच रमेश बाबू गरू हेसुद्धा साऊथचे नामांकित चेहऱ्यांपैकी एक होते. त्यांनी 1974 मध्ये 'अल्लूरी सीतारामाराजू' या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर रमेश बाबू यांनी अनेक तमिळ चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ना इले ना स्वर्गम, अन्ना चेलेलु, चिन्नी कृष्णुडु यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे केले. रमेश बाबू यांनी अनेक चित्रपटांत लहान बंधू महेश बाबू यांच्याबरोबरसुद्धा काम केले आहे.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]