Benwad Marathi Movie : 'बेनवाड' (Benwad) हा मराठी सिनेमा प्रेक्षकांना 13 फेब्रुवारी रोजी पाहता येणार आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात विनोदवीर भाऊ कदम आणि संदीप पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रने केले आहे. 


एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या बाबतीत काही दंतकथा असतात. बेनवाड हे असंच एक वेगळं नाव असलेलं  गाव. या गावाची पण एक दंतकथा आहे. गावात संज्या आणि रंज्या हे दोन भाऊ राहतात. संज्या आणि रंज्याच्या रूपात भाऊ कदम आणि संदीप पाठक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बेनवाड गावाच्या रक्षणाची जबाबदारी संज्या आणि रंज्या यांच्याकडं सोपवण्यात येते. त्यानंतर काय आणि कशा गोष्टी घडतात? त्याला संज्या रंज्या कसे सामोरे जातात? आणि गावाला असलेल्या शापातून ते गावाची सुटका करू शकणार का? याची मजेशीर ‘रोलर कोस्टर राईड’ म्हणजे बेनवाड चित्रपट.





भूतकाळाच्या खुणा दाखवत वर्तमानकाळात गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचा शोध घेऊ पहाणारा 'बेनवाड' हा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात भाऊ कदम, संदीप पाठकसह  कृतिका तुळसकर, राधा सागर, विजय निकम, शुभांगी भुजबळ, विजय पाटकर, संतोष शिंदे, रुक्मिणी सुतार, माधव अभ्यंकर, रमेश वाणी हेदेखील कलाकार आहेत.


संबंधित बातम्या


Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज


Sam Fernandes : सिनेनिर्माते सॅम फर्नांडिसने आदित्य पांचोली विरोधात केली तक्रार दाखल


कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha