बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'चा हिंदी ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. इंग्रजी सिनेमाप्रमाणेच हिंदी सिनेमाचंही ट्रेलर लाँच करण्यात आलं आहे. सिनेमाच्या हिंदी ट्रेलरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


या संपूर्ण ट्रेलरमध्ये प्रियंका फक्त एका सीनमध्ये दिसली आहे. ते देखील अवघ्या एका सेंकदासाठी. ट्रेलरमध्ये प्रियंकाचा कमी वावर दाखवल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये मात्र, बरीच नाराजी आहे. पण चाहत्यांनी नाराज होऊ नये असा प्रियंकानं म्हटलं आहे. कारण की, सिनेमात ती बराच वेळ दिसणार आहे.



बेवॉच सिनेमात प्रियंका एका नकारात्मक भूमिकेत दाखविण्यात येणार आहे. प्रियंका या सिनेमात हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन म्हणजेच WWEचा स्टार खेळाडू द रॉक सोबत काम करणार आहे. हा सिनेमा 26 मे 2017 साली प्रदर्शित होणार आहे.