Bawaal Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  वरुण धवन  (Varun Dhawan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor) यांच्या 'बावल' (Bawaal) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधील वरुण- जान्हवीच्या केमिस्ट्रीनं आणि ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


ट्रेलरच्या सुरुवातीला वरुण हा अजय दीक्षित या भूमिकेत दिसत आहे. अजय हा निशाच्या प्रेमात पडतो. निशा ही भूमिका जान्हवीनं साकारली आहे. बावल चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुढे दिसते की, अजय आणि निशा हे दोघे लग्न करतात. त्यानंतर दोघेही युरोपला जातात. पुढे युरोपमध्ये त्यांच्यासोबत काही घडामोडी घडतात.  या चित्रपटात वर्ल्ड वॉरबाबत देखील दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज हा ट्रेलर पाहून लावला जाऊ शकतो.  


प्राइम व्हिडीओच्या ट्विटर अकाऊंटवर बवाल या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आलं आहे. या ट्रेलरला कॅप्शन देण्यात आलं, "प्यार से बवाल तक का एक सफर!''


पाहा ट्रेलर: 






बवाल कधी होणार रिलीज?


बवाल हा चित्रपट 21 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


 'छिछोरे' चित्रपटानंतर नितेश तिवारी आणि साजिद ही जोडी पुन्हा एकदा बवाल या चित्रपटासाठी एकत्र आली आहे. आधी बवाल हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट 21 जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच जान्हवी आणि वरुण यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


ऑक्टोबर,बदलापूर, भेडिया,सुई धागा : मेड इन इंडिया,बद्रीनाथ की दुल्हनिया आणि जुग जुग जिओ या हिट चित्रपटांमध्ये वरुणनं काम केलं आहे. तर जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. आता जान्हवी आणि वरुण यांच्या बवाल या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bawaal Teaser: रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्स; जान्हवी आणि वरुणच्या 'बवाल' चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी ओटीटीवर होणार रिलीज