Kajol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) ही गेल्या काही दिवसांपासून विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही दिवसांपूर्वी काजोलचा लस्ट स्टोरीज-2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता लवकरच तिची द ट्रायल ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या काजोल या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहे. काजोल ही सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये काजोलनं राजकीय नेत्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्याला अनेकांनी ट्रोल केलं. आता काजोलनं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.


काजोलचं वक्तव्य



एका मुलाखतीमध्ये काजोल म्हणाली होती, 'आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी नाही.' काजोलच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता काजोलनं एका ट्वीटच्या माध्यमातून या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. 


काजोलचे ट्वीट



काजोलनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व याबद्दल एक मुद्दा मांडत होतो. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता, आपल्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर नेत आहेत.' काजोलनं हे ट्वीट करुन तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.






काजोलचे चित्रपट


काही दिवसांपूर्वी काजोलचा  'सलाम वेंकी'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. तिचा  लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज झाला. काजोलसोबतच या चित्रपटात तमन्ना भाटिया  , विजय वर्मा, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता  या देखील प्रमुख भूमिका साकारली. आता काजोलच्या द ट्रायल या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  ‘करण-अर्जुन’,  ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,‘गुप्त’,  'हलचल' या काजोलच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काजोल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Kajol: 'मी तिच्या जागी असते तर मी चप्पल काढली असती...'; पापाराझीबद्दल काजोलनं केलेल्या वक्तव्यानं वेधलं लक्ष