BanLipstick : सोशल मीडियावर गेले काही दिवस 'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग चांगलाच ट्रेडिंगमध्ये आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरत मराठीमधील काही आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत.  या व्हिडीओमध्ये तेजस्विनी पंडीतने लिपस्टिक लावण्याला विरोध केला होता. त्यानंतर #BanLipstick हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत होता. पण तेजस्विनीने लिपस्टिकला विरोध का केला? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता त्या मागचे कारण स्वत: तेजस्विनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.


सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत #BanLipstick नक्की काय? आहे हे सांगितले आहे. हा तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनचा भाग असल्याचे समोर आले आहे.


काही दिवसांपूर्वी तेजस्विनी पंडीतने 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक!' अशी कॅप्शन देत #BanLipstick हा हॅशटॅग वापरला होता. दुसरीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील "मला लिपस्टिकचा रंग नको...मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!", असे म्हणत व्हिडीओ शेअर केला होता. सोनाली खरेनेदेखील लिपस्टिक पुसतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले होते,"माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक".






लवकरच तेजस्विनीची 'अनुराधा' ही वेब सीरिजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याच सीरिजचे पोस्टर शेअर करत तिने लिहिले आहे,"सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. 'अनुराधा' येतेय… लवकरच फक्त 'प्लॅनेट मराठी' अ‍ॅपवर!". एकंदरीत सीरिजचे पोस्टर पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.


संबंधित बातम्या


Mahatma Phule Film : 'महात्मा फुले' यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटासाठी सव्वा दोन कोटींचा निधी मंजूर


Vicky-Katrina Wedding Exclusive : संगीत सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात, बरवाडा फोर्ट विद्युत रोषणाईने झगमगला, खास फोटो एबीपी माझाच्या हाती


Gadima Puraskar 2021 : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर झाला यावर्षीचा 'गदिमा पुरस्कार'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha