Vicky-Katrina Wedding Exclusive : संगीत सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात, बरवाडा फोर्ट विद्युत रोषणाईने झगमगला, खास फोटो एबीपी माझाच्या हाती

Vicky-Katrina Wedding Exclusive : विकी कौशलचे कुटुंबीय कतरिनाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

Continues below advertisement

Vicky-Katrina Wedding Exclusive : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कॅफच्या (Katrina Kaif) संगीत सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. विकीचे कुटुंबीय कतरिनाचे कुटुंबात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजस्थान सवाई माधोपूर येथे आजपासून लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

विकी कौशलचे पंजाबी कुटुंब आहे. विकीचे काका-काकी, मामा-मामी कतरिनाचे कुटुंबात अधिकृतपणे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. विकी आणि कतरिनाचा शाही विवाहसोहळा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही लग्नसोहळ्याची तयारी करत होते. 

कतरिनाचे कुटुंबीयदेखील लग्नसोहळ्यासाठी खास लंडनहून आले आहेत. विकी आणि कतरिना दोघेही त्यांच्या आयुष्यातील खास दिवस संस्मरणीय बनवत आहेत. आज संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 10 डिसेंबरला रिसेप्शनने या लग्नसोहळ्याची सांगता होणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे म्हटले जात आहे. 

कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.

लग्नातील फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटींची ऑफर
लग्नाच्या फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटी रुपयांची ऑफर ओटीटीकडून देण्यात आली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मला लग्नातील फोटो आणि व्हिडीओ स्ट्रीम करायचं आहे. त्याबदल्यात विकी-कॅतरिनाला 100 कोटींची ऑफर दिली आहे. दरम्यान, पाश्चात्य देशात सेलेब्रिटी लग्न करत असतील तर फुटेज मॅगझिन अथवा चॅनलला विकतात. अशातच आता भारतातीही हा ट्रेंड सुरु होणार का? याची उत्सुकाता चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola