Baipan Bhaari Deva : 'होऊ दे खर्च... सिनेमा आहे घरचा' असं म्हणत महिलावर्ग मोठ्या प्रमाणात 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा पाहायला जात आहेत. 23 दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला हा सिनेमा अनेक महिलांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. महिलांसह पुरुष मंडळींनीदेखील हा सिनेमा पाहिला आहे. पण तराही 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा महिलांनी डोक्यावर घेतला आहे.
रिलीजच्या 23 दिवसांनंतरही अनेक सिनेमागृहांत 'बाईपण भारी देवा'चे हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. कोरोनाकाळाआधी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली होता. त्यामुळे तीन वर्षांनंतर रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे सिनेमाच्या टीमसह प्रेक्षकदेखील 'सब्र का फल मीठा होता है' असं म्हणताना दिसत आहेत.
रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) अशा एका पेक्षा एक दर्जेदार अभिनेत्री या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सहा अभिनेत्रींच्या अभिनयाची मुशाफिरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सहा बहिणींची गोष्ट सिनेप्रेक्षकांसह महिलांना चांगलीच भावली आहे.
चारचौघींनी सुपरहिट केलाय 'बाईपण भारी देवा'!
'बाईपण भारी देवा' या सिनेमाला महिलांसह पुरुषवर्ग आणि तरुण मंडळींचादेखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'होऊ दे खर्च... सिनेमा आहे घरचा' असं म्हणत 'चारचौघी' सिनेमा पाहायला येतात. त्या आणखी 'चारचौघीं'ना सिनेमाबद्दल सांगतात. मग त्या 'चारचौघी' आणखी 'चारचौघीं'ना घेऊन सिनेमा पाहायला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी हा सिनेमा पुरुषांसाठी बनवल्याचं केदार शिंदे (Kedar Shinde) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 60 कोटींपेक्षा (Baipan Bhaari Deva Box Office Collection) अधिक कमाई केली आहे. कथा, पटकथा, कलाकारांचा अभिनय, गाणी, दिग्दर्शन अशा सिनेमातील सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहे. एकंदरीतच मराठी सिनेसृष्टीला या सिनेमाने सुगीचे दिवस दाखवले आहेत. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. प्रेक्षकांसह मनोरंजनक्षेत्रातील मंडळीदेखील या सिनेमाचं कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या