Badhaai Do : राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar)'बधाई दो' (Badhaai Do) सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. सिनेमाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


समलैंगिक जोडप्यांच्या प्रेमकहाणीवर सिनेमा भाष्य करणारा आहे. 'बधाई दो' हा सिनेमा रोमॅंटिक असण्यासोबत विनोदीदेखील आहे. सिनेमाच्या नवीन पोस्टरमध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर आनंदाने नाचताना दिसून येत आहेत. सिनेमात राजकुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून भूमी पेडणेकर पीटी शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे.






कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हर्षवर्धन कुलकर्णीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्राच्या 'बधाई हो' सिनेमाचा 'बधाई दो' हा सिक्वेल असणार आहे.


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती


Khiladi : रवी तेजाचा 'खिलाडी' 11 फेब्रुवारीला हिंदीतही होणार प्रदर्शित


Tejasswi Prakash : रोहित शेट्टीची निर्मिती, ‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटात झळकणार!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha