Kalki 2898 ad box collection day 11: प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) दररोज रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटाने 10 दिवसांत भारतात 465 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यातच आता 11 व्या दिवशीही या चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे.
प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 11 दिवसांत 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट रविवारीच 500 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा होती आणि तसंच झालं.
सिनेमाचं कलेक्शन किती?
सॅनसिल्कच्या अहवालानुसार कल्की 2898 AD ने रविवारी रिलीजच्या 11व्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये सायंकाळी 7:15 वाजेपर्यंत 36.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 502.42 कोटींवर पोहोचले आहे. दरम्यान हे प्रारंभिक आकडे आहेत. रात्री 10 नंतर अंतिम आकडे जाहीर होतील. पण या चित्रपटाने 11व्या दिवशी 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. पण कल्कि हा सिनेमा भारतातील सर्वात जलद 500 कोटी रुपये कमावणारा भारतीय चित्रपट बनला आहे.
कल्कीने मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड
कल्कीने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या 'पठाण' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. कल्कीने रिलीजच्या 11व्या दिवशी आतापर्यंत 36.72 कोटींची कमाई केली आहे. तर 11व्या दिवशी 'पठाण'ची कमाई 23.25 कोटी रुपये होती.तर दुसरीकडे कल्कीने शाहरुख खानच्या आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'चा रेकॉर्डही मोडला आहे. जवानाने 11व्या दिवशी 36.85 कोटींची कमाई केली होती. 11व्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत कल्की या कमाईच्या पुढे गेली आहे.
आतापर्यंत या चित्रपटांनी 500 कोटींची कमाई केली.
आत्तापर्यंत अनेक भारतीय चित्रपटांनी भारतात 500 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये बाहुबली 2, गदर 2, केजीएफ 2, पठाण, जवान, दंगल, बजरंगी भाईजान, आरआरआर आणि ॲनिमल या चित्रपटांचा समावेश आहे. कल्की सर्वात जलद 500 कोटींचा टप्पा पार करणारी आहे. हा आकडा पार करण्यासाठी पठाणला 28 दिवस लागले आणि जवानला 18 दिवस लागले.