बाहुबली 2 च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 41 कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या दिवशीच्या कमाईत प्रभासने आमीर आणि सलमानच्या चित्रपटांना मागे टाकलं असलं, तरी शाहरुखच्या सिनेमावर मात करण्यात तो अपयशी ठरला.
https://twitter.com/taran_adarsh/status/858195856427634692
सलमान खानच्या सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटी रुपये जमवले, तर दंगलने 29.78 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे साहजिकच हिंदीत आमीर-सलमानचे ओपनिंग डे चे रेकॉर्ड प्रभासकडून मोडित निघाले. मात्र ओपनिंग डेला हिंदी 'बाहुबली 2' शाहरुख खानच्या 'हॅपी न्यू इयर'च्या तुलनेत तोकडा पडला. 'हॅपी न्यू इयर'ने पहिल्या दिवशी 45 कोटी, म्हणजेच बाहुबली 2 पेक्षा 4 कोटी जास्त कमवले होते.
https://twitter.com/taran_adarsh/status/859246176108920832
मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन
बाहुबली 2 नं पहिल्याच दिवशी भारतात एकूण (सर्व भाषा मिळून) 121 कोटींची कमाई केली होती. यात हिंदीतील 41 कोटींशिवाय, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम यांच्या एकूण 80 कोटींच्या कमाईचा समावेश आहे.
हिंदी भाषेत बाहुबली 2 ला दीडशे कोटींचा टप्पा पार करण्यास चार दिवस (28 एप्रिल ते 1 मे - एक्स्टेंडेड वीकेंड) लागले. ‘बाहुबली द कन्क्लुजन’ने तीन दिवसात हिंदी भाषेत 128 कोटी रुपयांची कमाई केली.
शुक्रवारी बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी 41 कोटी, दुसऱ्या दिवशी 40.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 46.5 कोटी रुपयांची कमाई तर चौथ्या दिवशी (1 मे - एक्स्टेंडेड वीकेंड) 35 कोटी कमावले. म्हणजेच पहिल्या चार दिवसात हिंदी भाषेत अंदाजे 160 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन झालं आहे.
पहिला दिवस - शुक्रवार 28 एप्रिल - 41 कोटी
दुसरा दिवस - शनिवार 29 एप्रिल - 40.5 कोटी
तिसरा दिवस- रविवार 30 एप्रिल- 46.5 कोटी
चौथा दिवस - सोमवार 1 मे - 35 कोटी
बाहुबली 2 ने पहिल्या वीकेंडला (शुक्र ते रविवार म्हणजे 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2017) जगभरात तब्बल 540 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तीन दिवसातली कमाई पाहता आमीरच्या 'पीके'ला मागे टाकण्यास बाहुबली 2 ला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही, असं भाकित चित्रपट क्षेत्रातले जाणकार व्यक्त करतात.
https://twitter.com/taran_adarsh/status/859245946391060480
युनाईटेड स्टेट्समध्ये बाहुबली 2 हा तिसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. विन डिझेलच्या 'फास्ट अँड फ्युरियस 8' 'बाहुबली 2' पेक्षा सरस ठरला. विशेष म्हणजे अमेरिकेत फक्त 420 स्क्रीन्सवर झळकूनही तिथे 10 मिलियन डॉलर (64.13 कोटी) रुपये कमवण्यात यश आलं.
https://twitter.com/taran_adarsh/status/858976912168833026
'बाहुबली 2' म्हणजेच 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत.
बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली 1 हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.