मुंबई : अभिनेत्री काजोलने फेसबुक लाईव्हद्वारे एक व्हिडीओ शेअर केला. मात्र या व्हिडीओनंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. या व्हिडीओमध्ये जेवण करताना एक डिश दिसत आहे, हीच डिश वादाचं कारण बनली. वादानंतर काजोलने व्हिडीओ डिलीट केला.

काजोल खात असलेल्या डिशमध्ये बीफ होतं. काजोलने मित्राला या डिशविषयी सांगायला सांगितलं. काजोलचा मित्र रेयानने हे बीफ असल्याचं लाईव्ह व्हिडीओमध्ये सांगितलं. त्यानंतर काजोल अडचणीत आली.

काजोलचं स्पष्टीकरण

डिशमध्ये बीफ असल्याचं पाहून त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. वाद वाढत असल्याचं पाहून काजोलने यावर स्पष्टीकरण दिलं.

''माझ्या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या डिशमध्ये बीफ असल्याचं सांगितलं जात आहे.


मात्र ते बीफ नसून म्हशीचं मांस होतं,


जे कायदेशीररित्या सहजपणे मिळतं.


हा धार्मिक मुद्दा आहे आणि कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्यामुळे मी हे स्पष्टीकरण देत आहे'',


असं काजोलने म्हटलं आहे.