Ayushmann Khurrana T-20 World Cup :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खूपच चुरशीचा झाला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात करत अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि  टी-20 विश्वचषकावर नाव कोरले. विश्वविजेत्या टीम इंडियावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) टीमला खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक खास कविता लिहिली आहे. 


टीम इंडियाने टी-20 च्या फायनल मॅचमध्ये बाजी मारल्यानंतर इतर क्रिकेटप्रेमींप्रमाणे अभिनेता आयुष्मान खुरानाच्याही आनंदाला पारावर उरला नाही. आयुष्मान खुरानाने क्रिकेट वन-डे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता काही महिन्यांतच भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्याने आयुष्यमानने आनंद व्यक्त केला आहे. आयुष्मानच्या या कवितेचे चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. 


काय आहे आयुष्यमानची कविता?


आयुष्यमानने व्हिडीओ शेअर करत हिंदीतील कविता सादर केली आहे. त्याने आपल्या कवितेत म्हटले की,  ‘सेमी फाइनल में कोहली के मुंह से निकला था बेन स्टोक्स, तब तो आलोचको ने लगा दिए थे सारे चोक्स, इस फाइन में दिखा दिया विराट ने अपना असली रूप, समझो प्यारे, इतना ही तो है जीवन, छांव और धूप. पंड्या को भी पिछले कुछ महीने में बहुत कुछ कहा-सुनाया, लेकिन फाइनल में उसी ने तो जलवा दिखाया है. और मूछें हों तो हार्दिक जैसी हों, वर्ना न हों, और बॉलिंग हो तो फिर बुमराह जैसी हो वर्ना न हो, और अक्सर, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करती हैं कि अगर मेरा कैच न पकड़ा गया होता तो क्या होता, होता है ब्रो होता है, मैच में सबका साथ होता है.


 







मजा तो तब है जब हम भारतीय हार में भी अपने खिलाड़ियों के साथ शामिल हों, जिंदगी के उतार-चढ़ाव में उसको समझने की कोशिश करें, नहीं तो शर्मा जी का बेटा ऐसा नहीं कहता- आगे डालेगा तो देगा मैं, इस टीम का हर खिलाड़ी देश के लिए खेला है, अर्शदीप से अगर कैच छूटे तो उसे देशद्रोहा न कहें, शमी अगर ऊपरवाले को याद पिच पर करे तो उसे लगा लें गले, इस टीम में हिंदू, मुस्लिम और सिख हैं, और ये सब भारतीय दिखें, इंडिया-इंडिया, 19 नवंबर का जख्म अब तुमने भर दिया.’