Adarsh Shinde New Song Prabhu Shree Ram : अयोद्धेतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. अयोध्येला जाण्यासाठी राम भक्त उत्सुक आहेत. रामललाच्या प्रतिष्ठापनेचा देशभरात उत्साह आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने (Adarsh Shinde) 'प्रभू श्रीराम' (Prabhu Shree Ram) हे गाणं गायलं आहे. आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.


आदर्श शिंदेच्या आवाजातील दमदार गाणं 'प्रभू श्रीराम'


अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे 22 जानेवारीला उद्‌घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा लाँच करण्यात आला आहे. 


अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला


प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे. विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे.  अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला असलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे.


ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार आहे.


आदर्श शिंदेची खास पोस्ट (Adarsh Shinde Post) 


आदर्श शिंदेने 'प्रभू श्रीराम' हे गाणं आऊट झाल्याची चाहत्यांना माहिती देत खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"अयोध्येचा राजा आपला लवकरच राम मंदिरी अवतरणार. भक्ती श्रद्धेचा सागर भरून भगवा रंग आसमंती उधळणार".


आदर्श शिंदेबद्दल जाणून घ्या.. (Adarsh Shinde Profile)


पार्श्वगायक आनंद शिंदे यांचा मुलगा आदर्श शिंदे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्याने गाणं शिकण्यास सुरुवात केली. सुरेश वाडकर यांच्याकडून त्याने शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहेत. आदर्श शिंदेने आजवर मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमधील 1500 हून अधिक गाणी गायली आहेत. 



संबंधित बातम्या


Swati Mishra: कोण आहे स्वाती मिश्रा? जिचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केलं कौतुक