Avatar The Way Of Water OTT Release : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 


जेम्स कॅमेरॉन (James Cameron) दिग्दर्शित 'अवतार 2' (Avatar 2) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाची जादू सिनेमागृहात अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा घरबसल्या अनुभवण्याची चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आता हा निर्माते हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा विचार करत आहेत. 


'अवतार 2' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल? (Avatar 2 Release On OTT Platform)


मीडिया रिपोर्टनुसार, 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. सिनेमागृहात 45 दिवस पूर्ण केल्यानंतर सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतो. पण अद्याप 'अवतार 2'च्या निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. 






'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने 1.7 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 2 बिलियनचा आकडा पार करू शकतो. तर भारतातदेखील हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 


संबंधित बातम्या


Avatar 2 Box Office Collection : 'अवतार 2'ची तीन दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; जाणून घ्या आतापर्यंतचं कलेक्शन...