Attack Trailer : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या (John Abraham) बहुचर्चित 'अटॅक' (Attack) सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये रोमान्स आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. सिनेमात जॉन धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. 


'अटॅक' सिनेमाचा पहिला भाग 1 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहमसोबत रकुल प्रीत सिंह आणि  जॅकलिन फर्नांडिसदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात जॉन सोल्जरची भूमिका साकारत आहे.






जॉन अब्राहमने सोशल मीडियावर अटॅक सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिले आहे, "देशाला वाचवणारा सोल्जर तुमच्या भेटीसाठी सज्ज आहे". या सिनेमाचा निर्मातादेखील जॉन आहे.





'अटॅक' सिनेमानंतर जॉनचा 'पठाण' सिनेमा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी जॉन स्पेनला रवाना झाला आहे. या सिनेमात जॉन शाहरुख खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Netflix Ban in Russia: रशिया-युक्रेन युद्धाचा मनोरंजनविश्वावरही परिणाम, नेटफ्लिक्सकडून रशियातील सेवा स्थगित!


Jhund Box Office Collection : 'झुंड'ने उत्सुकता वाढवली, कमाईचा आकडा वाढला, पहिल्या आठवड्याची कमाई....


Action Films : ‘आरआरआर’ ते ‘पठाण’, यंदाच्या वर्षात बॉक्स ऑफिसवर दिसणार अ‍ॅक्शनचा धमाका!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha