Action Films in 2022-23 : येत्या काही दिवसांत बॉलिवूडचे अनेक दमदार अ‍ॅक्शन चित्रपट (Action Movies) रिलीजसाठी सज्ज आहेत. अक्षय कुमारपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि सलमान खानपासून कंगना रनौतपर्यंत अनेक सेलिब्रिटींचे दमदार अ‍ॅक्शन चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. तुम्ही देखील अ‍ॅक्शनचे फॅन असाल, तर आतापासून चित्रपट पाहण्याची योजना बनवून ठेवा.


धाकड : कंगना रनौतचा चित्रपट 'धाकड' हा तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘धाकड’ चित्रपटात कंगना रनौत एजंट अग्निच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे अनेक अ‍ॅक्शनपॅक पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. हा चित्रपट 27 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे.


हिरोपंती 2 : ‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या सिक्वेलसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘हिरोपंती 2’मध्ये टायगरची जोडी तारा सुतारियासोबत जमणार आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.


अटॅक : जॉन अब्राहमच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘अटॅक’ हा चित्रपटही आहे. या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह दिसणार आहेत. 1 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अ‍ॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.


पठाण : बॉलिवूड किंग शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘पठाण’ या चित्रपटात हे तिघेही झळकणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे, ज्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.


आरआरआर : एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपट RRRची रिलीज डेट बर्‍याच वेळा बदलली. पण, आता हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ज्युनियर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण स्टारर चित्रपट ‘आरआरआर’मध्ये भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी रिलीज होणार आहे.


बच्चन पांडे : अक्षय कुमार, क्रिती सेनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक खूपच किलर असून, तो भरपूर अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.


टायगर 3 : ईदच्या दिवशी म्हणजेच 21 एप्रिल 2023 रोजी सलमान खान आणि कतरिना कैफ ‘टायगर 3’ या चित्रपटातून धमाका करणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागात दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळाली, त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाकडून अधिक अपेक्षा आहेत.


फायटर : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटात दोघेही एकत्र झळकणार आहेत. 26 जानेवारी 202 रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha