Swara Bhaskar: गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणाबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आता या प्रकरणाबद्दल अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhaskar) देखील एक ट्वीट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. स्वरानं या ट्वीटच्या माध्यमातून प्रशासनावर निशाणा साधला आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


स्वरानं ट्वीटमध्ये लिहिलं,'एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग असो किंवा एन्काउंटर, या साजऱ्या करण्यासारख्या गोष्टी नाहीयेत. हे राज्य नियमाविरुद्ध काम करत असल्याचे संकेत, या गोष्टी देत आहेत.  राज्याच्या एजन्सींची विश्वासार्हता संपली आहे, हे यातून सूचित होतं. कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करत आहेत, हे या गोष्टी दर्शवतात. हे भक्कम प्रशासन नाही, ही अराजकता आहे.' स्वाराच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 






अतिक अहमद 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातही प्रमुख आरोपी होता. यापूर्वी अतीकचा मुलगा असद अहमद 13 एप्रिल रोजी झाशीमध्ये चकमकीत मारला गेला होता. त्यासोबत शूटर गुलामलाही यूपी एसटीएफने मारले होते.


अतिक अहमद आणि अश्रफ अहमद या दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात असताना तीन लोक आले आणि त्यांनी त्यांची हत्या केली. या तीन हल्लेखोरांपैकी एका व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. 


स्वराचे चित्रपट


स्वराच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. स्वरा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवरील तिची मतं व्यक्त करत असते. स्वराच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेक वेळा नेटकरी तिला ट्रोल करतात. तर काही नेटकरी तिचं कौतुक देखील करतात. स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमध्ये स्वरानं काम केलं आहे.


महत्वाच्या इतर बातम्या:


Swara Bhaskar Wedding Party Card: 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'हम सब एक है'; स्वरा आणि फहादच्या वेडिंग पार्टी कार्डवर काय लिहिलंय? पाहा व्हायरल फोटो