Swara Bhaskar Wedding Party Card: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्कर  (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. 16 फेब्रुवारीला स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले. आता लवकरच स्वरा आणि फहाद यांची वेडिंग पार्टी आयोजित करण्यात येणार आहे. स्वरा आणि फहाद यांच्या वेडिंग पार्टीची सध्या तयारी सुरु आहे. या दोघांच्या वेडिंग पार्टी कार्डचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये काही स्लोगन लिहिलेले दिसत आहेत. स्वरा आणि फहाद यांच्या वेडिंग कार्डच्या व्हायरल फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले.  


स्वरा आणि फहाद यांच्या वेडिंग पार्टी कार्डवर  हम भारत के लोग, इन्कलाब जिंदाबाद, हम भारत के लोग हे स्लोगन्स लिहिलेले दिसत आहेत. तसेच या कार्डवर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डीडीएलजे या चित्रपटाचं पोस्टर देखील दिसत आहे. वेडिंग कार्डवर एक मुलगा, एक मुलगी आणि एक मांजर दिसत आहे.


नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 


स्वरा आणि फहाद यांच्या वेडिंग पार्टी कार्डच्या व्हायरल फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मला ही आयडिया खूप आवडली.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, हे पेंटिंग खूप छान आहे.'


 






फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.अभिनेत्री स्वरा भास्करनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करुन तिच्या आणि फहादच्या कोर्ट मॅरेजची माहिती चाहत्यांना दिली होती. स्वरा आणि फहादच्या कोर्ट मॅरेजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


स्वराचे चित्रपट


स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही महिन्यांपूर्वी स्वरा 'जहा चार यार' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली.  या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारली. 


महत्वाच्या इतर बातम्या:


स्वरा आणि फहाद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; जितेंद्र आव्हाड, कंगना रनौतनं शेअर केली पोस्ट