मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन हे दोघे बेस्ट फ्रेण्ड आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र हे दोन्ही स्टार किड्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्यन आणि नव्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

 
आर्यन आणि नव्या लंडनमधील एकाच शाळेत शिकतात. दोघांचं अफेअर असल्याची चर्चाही आहे. नुकताच या दोघांचा एक बोल्ड फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये नव्याने तिच्या मानेवर लावलेल्या स्टिकरमुळे सगळ्यांचं लक्ष आकर्षित होत आहेत. या स्टिकरवर आक्षेपार्ह शब्द लिहिले आहेत.


काही वर्षांपूर्वी नव्या आणि आर्यन यांचा एक एमएमएस लीक झाल्यानंतर दोघांचे संबंध समोर आले होते. परंतु हा एमएमएस बनावट असल्याचं सांगण्यात आलं. तरीही दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो वारंवार समोर आले आहेत.

 
आर्यन आणि नव्या यांच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी हे फोटो काढण्यात आले. यावेळी मैत्रिणींसोबतचे काही फोटो नव्याने तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.