Arunabh Kumar Case: ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनेल टिव्हीएफ (TVF) म्हणजेच 'द व्हायरल फीवर' चा संस्थापक अरुणाभ कुमारची (Arunabh Kumar) न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. एफआयआरच्या उशीरा नोंदवण्याच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे, असं न्यायालयाचं म्हणणं आहे.
अरुणाभ कुमारवर पाच वर्षांपूर्वी एका तरुणीनं लैंगिक छळाचा आरोप केला होता. तक्रारीच्या आधारे, अंधेरी पोलिसांनी 2017 मध्ये अरुणाभ कुमार विरुद्ध आयपीसी कलम 354A आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. रिपोर्टनुसार, महानगर दंडाधिकारी न्यायालयानं सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. एफआयआर नोंदवण्यासही विलंब झाला, त्यामुळे फिर्यादी खटला संशयाच्या भोवऱ्यात सापडला. व्यावसायिक स्पर्धेमुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही म्हणता येईल.
एका तरुणीनं अरुणाभ कुमारवर आरोप केले होते की 2014 मध्ये अरुणाभनं तिचे लैंगिक शोषणा , परंतु तिनं तक्रार तीन वर्षांनंतर दाखल केली. तरुणी TVF च्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेली होती. यावेळी अरुणाभ यांनी तिच्याशी अश्लिल चाळे केल्याचा आरोप तिने केला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली होती.
कोण आहे अरुणाभ कुमार?
अरुणाभ कुमार हा आयआयटी पदवीधर आहे. तसेच अरुणाभनं ओम शांती ओम या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक काम देखील. त्याने 2011 मध्ये टिव्हीएफ या ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनेलची सुरुवात केली. अरुणाभ कुमारनं टिव्हीएफमधून पर्मानेंट रुममेट आणि पिचर्स या शोची निर्मिती केली. यामधील पिचर्स या वेब सीरिजचा दुसरा भाग झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अरुणाभ कुमारनं काम केलं आहे. 'पिचर्स सीझन 2' ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. नवीन कस्तुरिया, आशिष विद्यार्थी, अभय महाजन, अभिषेक बॅनर्जी आणि अरुणभ कुमार यांच्यासोबत गोपाल दत्तही देखील या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता 'पिचर्स सीझन 2'लाही पहिल्या सीझनचं प्रेम मिळतं की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: