Adipurush: सध्या  'आदिपुरुष' (Adipurush)  हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. आता रामानंद सागर यांची मालिका 'रामायण' मध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे. 


अरुण गोविल यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अरुण गोविल यांनी सांगितलं, 'मला सर्व जण प्रतिक्रिया द्या असे म्हणतं होते मी त्यांना नकार दिला. नंतर मी ठरलवं की मी तुमच्यासमोर या विषयावर प्रतिक्रिया मांडावी. खूप दिवसांपासून मी बऱ्याचं गोष्टींचा विचार करत होतो. त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याची वेळ आली आहे. 'रामायण' आणि 'महाभारत' हे सर्व पौराणिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ हा आपला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. ते बदलले जाऊ शकत नाही. त्याची छेडछाड करणे योग्य नाही.' 


अरुण गोविल म्हणाले, 'धर्माची चेष्टा करू नका'


'काही फिल्ममेकर्स, लेखक, अभिनेते, पेंटर्स यांनी क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावानं धर्माची चेष्टा करू नये. ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.' असंही या व्हिडीओमध्ये अरुण गोविल यांनी सांगितलं. 


पाहा व्हिडीओ: 



12 जानेवारी 2023 रोजी  IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष हा पौराणिक शैलीतील चित्रपट आहे हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: