Housefull 5 Film Update : 'हाऊसफुल' (Housefull) ही सीरिज प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 2010 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाचे सीक्वल आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. आता या सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच 'हाऊसफुल 5' (Housefull 5) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल'चे निर्माते साजिद नाडियावालाने 'हाऊसफुल 5'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तसेच या सीरिजमधील सर्व कलाकार 'हाऊसफुल 5'मध्ये दिसून येणार आहेत. सध्या या सिनेमाच्या कथानक आणि पटकथानकावर काम सुरू आहे. 






'हाऊसफुल 5'मध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. 'हाऊसफुल' हा सिनेमा 2010 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग 2012 साली तर तिसरा भाग 2016 साली रिलीज करण्यात आला. 2019 साली चौथा भाग प्रदर्शित झाला. 


'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटणार 


एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'हाऊसफुल'मुळे बॉक्स ऑफिसचा बादशाह बनला होता. त्यामुळे आता चाहते 'हाऊसफुल 5'ची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटणार आहे. 'हाऊसफुल 5' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan: 'चिकन 65 ची रेसिपी शिकायची आहे'; शाहरुखच्या ट्वीटनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष!


Goodbye Box Office Day 1: रश्मिका अन् बिग बींच्या 'गुडबाय' ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...