Arun Govil Injured On Movie Set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रामायण' (Ramayan) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी रामाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली. पण आता एका वेगळ्याच कारणाने ते चर्चेत आले आहेत. अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे.
अरुण गोविल त्यांच्या आगामी 'नोटिस' (Notice) या सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमाचं शूटिंग शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना अरुण गोविल यांना दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यानंतरही अरुण गोविल यांनी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. अरुण गोविल यांना दुखापत झाल्याने एकीकडे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे मात्र चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.
'या' सिनेमाचं शूटिंग करत होते अरुण गोविल
अरुण गोविल 'नोटिस' (Notice) या सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमात ते दीपिका चिखलियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'रामायण' या सिनेमात दीपिका चिखलिया सीता मातेच्या भूमिकेत दिसली होती. अभिनेते अरुण गोविल आता प्रताप रघुवंशी यांच्या 'नोटिस' या सिनेमात दिसणार आहेत. चित्रकूटमध्ये शूटिंग सुरू असताना अरुण गोविल यांना दुखापत (Arun Govil Injured Shooting) झाली आहे.
आदित्य प्रताप रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्शन सीनचं शूटिंग करताना अरुण गोविल यांना दुखापत झाली आहे. अरुण गोविल यांना दुखापत झाल्यानंतर सेटवरील सर्व मंडळी घाबरलेली होती. पण दुखापतीकडे दुर्लक्ष करत अरुण गोविल यांनी शूटिंग सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.
आदित्य प्रताप रघुवंशी पुढे म्हणाले,"अरुण गोविल हे खूप दयाळू व्यक्ती आहेत". अरुण गोविल यांच्या आगामी 'नोटिस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रदीप गुप्ता सांभाळत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाची अरुण यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अरुण गोविल यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
संबंधित बातम्या