आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली सातत्याने नवनव्या वादामध्ये येतो आहे. आधी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्याचं नाव घेतलं जात होतं. आता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातही त्याचं नाव येऊ लागलं आहे. परिणामी त्याला या दोन महिन्यात अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सतत निगेटिव्ह कमेंट, ट्रोलर्सची टीका यांना कंटाळून आपल्या सगळ्या इन्स्टा पोस्ट काढून टाकल्या आहेत.

सूरज पांचोलीने आपल्या सगळ्या पोस्ट काढून टाकल्या आहेत. तर केवळ आपली 29 व्या वाढदिवसाची पोस्ट त्याने ठेवली आहे. बाय बाय इन्स्टा असं सांगून आपण परत भेटू, पण जेव्हा जग एक चांगलं ठिकाण बनलं असेल. मला श्वास घ्यायचा आहे, असंही तो सांगतो. तर दुसरीकडे अभिनेत्री पूजा भट्टनेही इन्स्टाला राम राम ठोकला आहे. सुशांतसिंह मृत्यूनंतर नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला. त्यात महेश भट्ट यांचं नाव आलं शिवाय, आलिया, पूजा यांच्यावरही सुशांतप्रेमी बरसले. टीका होत होती तोवर ठीक होतं. पण आता पूजाला इन्स्टावरून जीवे मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन पूजानेही इन्स्टा अकाऊंटचं स्टेटस प्रायव्हेट केलं आहे. आता इन्स्टावर तुम्ही पूजा भट्ट सर्च केलंत तर तिचं अकाऊंट दिसत नाही. तिच्या फ्रेंडलिस्ट मध्ये असलेल्यांनाच ते अकाऊंट दिसेल. सततच्या ट्रोलर्सच्या टोमण्यांना कंटाळून पूजाने हे पाऊल उचललं आहे.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या घरी सीबीआयची टीम दाखल; क्राईम सीन रिक्रिएट करणार

सोनाक्षीची नवी मोहीम - अब बस
इन्स्टासह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कलाकारांना छळवणुकीला सामोरं जावं लागतं. इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यापैकी असा एकही प्लॅटफॉर्म नाही जिथे कलाकारांना टीका सहन करावी लागत नाही. टीका होत होती तोवर ठिक आहे. पण आता कलाकारांचा मानसिक छळ करण्याकडे ट्रोलर्सचा कल वाढतो आहे. हे लक्षात घेऊन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अब बस ही कॅम्पेन सुरू केली आहे. असा कोणी जर कुणाचा छळ करत असेल तर मुंबई पोलीस, सायबर पोलीस यांच्या सहकार्याने ही कॅन्पेन सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एका ट्रोलकऱ्याला पकडण्यातही आलं आहे. यापुढे बोलायचं त जपून बोला असा दम तिने आपल्या एका इन्स्टा क्लिपद्वारे ट्रोलकऱ्यांना भरला आहे.

SSR Suicide Recreation | सुशांतच्या घरी आत्महत्येचं रिक्रिएशन, टेरेसवरील पाण्याच्या टाकीचीही तपासणी