Article 370 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) सध्या 'आर्टिकल 370' (Article 370) या सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक काही दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे.
'आर्टिकल 370'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर 23 फेब्रुवारी 2024 रोजी हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमागृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तसेच सिनेप्रेक्षकांचा या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने शानदार ओपनिंग केली. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
'आर्टिकल 370'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (Article 370 Box Office Collection Day 3)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'आर्टिकल 370' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.9 कोटींची शानदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी 7.4 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.50 कोटींची कमाई केली. एकंदरीत रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 22.8 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'आर्टिकल 370'चं प्रंतप्रधानांकडून कौतुक
'आर्टिकल 370' हा सिनेमा रिलीज होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सत्य लोकांसमोर येईल, असे मोदी म्हणाले होते. 'सिनेमा लव्हर्स डे' दिवशी या सिनेमाचं तिकीट फक्त 99 रुपये होते. जम्मू-काश्मीर राज्यासाठी संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याबाबतची गोष्ट 'आर्टिकल 370' या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
'आर्टिकल 370' या सिनेमात यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आदित्य सुहास जंभाले या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 20 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
आदित्य धर यांनी 'आर्टिकल 370' या सिनेमाची निर्मिती केली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. प्रियामणि, वैभव तत्ववादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
संबंधित बातम्या