Article 370 Box Office Collection Day 2 : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam) 'आर्टिकल 370' (Article 370) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने शानदार ओपनिंग केली. आजही बॉक्स ऑफिसवर यामी गौतमचा बोलबाला पाहायला मिळत आहे.


'आर्टिकल 370'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (Article 370 Box Office Collection Day 2)


'आर्टिकल 370' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.9 कोटींची शानदार ओपनिंग केली. आता वीकेंडचाही या सिनेमाला फायदा मिळत आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीदेखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. शनिवारी आतापर्यंत या सिनेमाने 1.96 कोटींची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 'आर्टिकल 370' या सिनेमाने आतापर्यंत 7.86 कोटींचा गल्ला जमवला आहे.






'आर्टिकल 370' अन् 'क्रॅक' आमने-सामने


'आर्टिकल 370' हा सिनेमा शुक्रवारी (23 फेब्रुवारी 2024) 'सिनेमा लव्हर्स डे'च्या  (Cinema Lovers Day) मुहूर्तावर रिलीज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे 'आर्टिकल 370' हा सिनेमा आणि विद्युत जमवाल आणि नोरा फतेही स्टारर 'क्रॅक' हा सिनेमा एकाचदिवशी रिलीज झाले आहेत. पण 'आर्टिकल 370' या सिनेमाने क्रॅक सिनेमावर मात केली आहे. क्रॅकने ओपनिंग डेला 4.25 कोटींची कमाई केली होती. 


'आर्टिकल 370'बद्दल जाणून घ्या.. (Article 370 Movie Details)


जम्मू-काश्मीर राज्यासाठी संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याबाबतची गोष्ट 'आर्टिकल 370' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात यामी गौतमसह, प्रियामणी, किरण कर्माकर आणि अरुण दोविल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आदित्य सुहास जंभाले या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 20 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 


आदित्य धर यांनी 'आर्टिकल 370' या सिनेमाची निर्मिती केली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. प्रियामणि, वैभव तत्ववादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


संबंधित बातम्या


Article 370 Movie Review :  यामी गौतमची कधीही न पाहिलेली झलक, Article 370 आहे कसा? वाचा रिव्ह्यु