मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु होती. या सर्व अफवा असल्याचं स्वत: अर्जुन कपूरने सांगत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लग्न केलं तर सर्वांना नक्की सांगेन, असंही अर्जुनने यावेळी सांगितलं.


अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लगीनगाठ असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चांवर बोलताना अर्जुन म्हणाला की, "सध्यातरी मी लग्न करत नाहीये. मी लग्न करेन तेव्हा याबाबत सर्वांना सांगेन. ही गोष्ट लपवण्यासाठी माझ्याकडे काही विशेष कारण नाही. लोकांपासून लपवावं असं यामध्ये काहीच नाही. मी माझ्याबद्दल इतर काही लपवत नाही, तर लग्नाची गोष्ट का लपवेन?"


मी सध्या माझ्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे सध्या माझा लग्न करण्याचा विचार नाही. लोक काय म्हणतात, मला याची पर्वा नाही. तसेच वेळेपूर्वी कोणतंही काम करणं मुर्खपणा असतो, असं ही अर्जुनने सांगितलं.


मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा 16 वर्षांचा मुलगा आहे. अरबाजही गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं.