Arjun Kapoor Net Worth, Cars, Property : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. 'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुन हा चित्रपट निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor)यांचा मुलगा आहे. अर्जुननं बॉलिवूडमध्ये त्याची विशेष ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
अर्जुनकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. रिपोर्टनुसार, अर्जुन 88 कोटी संपत्तीचा मालक आहे. एका माहिन्यात अर्जुन एक कोटीपेक्षा जास्त कमाई करतो. वर्षभरात जवळपास 8 ते 10 कोटी रूपये अर्जुन कमावतो. एका चित्रपटात काम करण्यासाठी अर्जुन 8 ते 10 कोटी मानधन घेतो. तसेच एका जाहिरातीसाठी तो 1 कोटी मानधन घेतो. अर्जुनचं मुंबईमध्ये आलिशन घर आहे. रिपोर्टनुसार, त्याच्या घराची किंमत 20 कोटी आहे. त्याच्याकडे ऑडी आणि मर्सिडीज यांसारख्या लग्झरी गाड्या अर्जुनकडे आहे.
अभिनेत्री मलायरका आरोरा आणि अर्जुनच्या अफेअरबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरू असते. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'
संबंधित बातम्या
Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha