Arjun Kapoor Bashed Out At Trollers : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील चर्चात असणारी जोडी आहे. मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. एका मुलाखतीमध्ये ट्रोल करणाऱ्यांना अर्जुननं उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत अर्जुननं सांगितलं, 'मलायका आणि मी सोशल मीडियावरील 90 टक्के कमेंट्स वाचत देखील नाही. मी ट्रोल करणाऱ्यांना ज्यास्त महत्व देत नाही. जे लोक ट्रोल करतात तेच लोक माझ्यासोबत सेल्फी घेण्याचा आग्रह करतात. त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही.'
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अर्जुननं लग्नाबाबत सांगितलं,'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.
संबंधित बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha