Archana Puran Singh :   सिनेसृष्टी ते छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने अर्चना पूरन सिंहने (Archana Puran Singh) प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अर्चनाने खलनायिकेपासून ते विनोदी ढंगाच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. 'मिसेस ब्रिगेंजा' या नावाने ओळखली जाणारी अर्चना पूरन सिंह ही छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये आपल्या गडगडाटी हास्यामुळे देखील ओळखली जाते. कॉमेडी शोमध्ये अर्चनाची चांगली कमाई होते. कपिल शर्माच्या एका एपिसोडसाठी तिला बक्कळ मानधन मिळते. 


हसून किती कमावते अर्चना पूरन सिंह 


एका वृत्तानुसार, अर्चना प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रुपयांचे मानधन घेते. कपिल शर्माच्या तिसऱ्या सीझनमध्ये अर्चनाने एकूण जवळपास 8 कोटींची कमाई केली होती. अर्चनाची एकूण संपत्ती ही एकूण संपत्ती 31 दशलक्ष डॉलर्स घरात असल्याचे म्हटले जाते.  






अर्चना पूरन सिंह आपल्या कमालीच्या अभिनयासाठी ओळखली जाते. 'जलवा', 'अग्निपथ', 'सौदागर', 'राजा हिंदुस्थानी', 'कुछ कुछ होता है' सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. त्याशिवाय, अर्चनाने 'कॉमेडी सर्कस' आणि 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' सारख्या कॉमेडी रिएलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून झळकली होती. 


कपिल शर्माकडून अर्चनाला टोमणे






द कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्मा आणि अर्चना पूरन सिंह यांच्यात थट्टामस्करी सुरू असते. कपिल शर्मा तिला  गंमतीत टोमणे मारतो. तर, अर्चनादेखील संधी साधत त्याला प्रत्युत्तर देत त्याची फिरकी घेते. प्रेक्षकही याचा आनंद घेतात. कपिल शर्मा पुन्हा एकदा आपला कॉमेडी शो घेऊन येणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) हा कॉमेडी शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 मार्च पासून सुरू होणार आहे. 


इतर संबंधित बातमी :