Dunki Release: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणार शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा याच्यासाठी 2023 हे वर्ष खास होते. या वर्षी रिलीज झालेले शाहरुखचे पठाण आणि जवान हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आता आज (21 डिसेंबर) त्याचा डंकी (Dunki) हा चित्रपट रिलीज झाला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होताच आता शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला आहे.


फटाक्यांची आतषबाजी अन्  ढोल-ताशे


ढोल-ताशांचे वादन आणि फटाक्यांच्या आतषबाजी करत डंकी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो प्रेक्षकांनी साजरा केला.  लोकांचा मोठा जमाव थिएटरबाहेर एकत्र आला होता. विविध ठिकाणच्या थिएटरबाहेर शाहरुख खानचे मोठे कट आउट्स देखील लावण्यात आले आहेत.  


ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, SRK चे चाहते ढोल वाजवत एकत्र नाचताना दिसले. काही चाहत्यांनी फ्लाइटचे कटआउट्स हातात धरून डान्स केला, त्यावर 'डंकी' असं लिहिलेले दिसले.  










थिएटरच्या आत देखील चाहत्यांनी केला जल्लोष


डंकी चित्रपचटाचा शो सुरु असताना थिएटरच्या आत देखील चाहत्यांनी जल्लोष केला. चित्रपटातील लुट पूट गया या गाण्यावर थिएटरमध्ये चाहते थिरकले तर चित्रपटाच्या काही सीननंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.






 राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित डंकी या चित्रपटात शाहरुखसोबतच  तापसी पन्नू (Taapsee Pannu), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि बोमन ईराणी (Boman Irani)  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Dunki First Review : 'डंकी' भावनांचा रोलरकोस्टर! कधी डोळ्यात टचकन पाणी तर कधी गालावर हसू, व्हिंटेज वाईब देणारा शाहरुखचा ''डंकी'' चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू