Malaika Arora And Arbaaz Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची ओळख एकेकाळी 'बॉलिवूडचे पॉवर कपल' अशी होती. पण 2017 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मलायकाच्या ड्रेसिंग सेन्समुळे दोघांचा घटस्फोट झाला अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. पण याबाबत स्वत: अरबाजनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
फोटोशूटदरम्यान झाली भेट
मलायका आणि अरबाज यांची भेट 90 च्या दशकात एका फोटोशूटदरम्यान झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
1998 मध्ये बांधली लग्नगाठ
1998 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. 2002 मध्ये मलायका आणि अरबाज हे आई-बाबा झाले. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव अरहान असं ठेवलं.
19 वर्षाच्या संसारानंतर घेतला घटस्फोट घेण्याचा निर्णय
जवळपास 19 वर्षाच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा हिने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, तिला पुढील जन्मातही खान कुटुंबाची सून व्हायचे आहे. पण नंतर अरबाज आणि मलायका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे, अशा अनेक बातम्या समोर आल्या.
मलायकाची ड्रेसिंग स्टाईलमुळे अरबाजनं घेतला होता घटस्फोट घेण्याचा निर्णय?
मलायका आणि अरबाज यांच्या घटस्फोटामागे नेमके कारण काय आहे? हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे होते. तसंच मलायकाची ड्रेसिंग स्टाईल किंवा फॅशनमुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला होता.याबाबत अरबाजला देखील एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यानं उत्तर दिलं, "मलाइकाच्या कपड्यांवर मी कधीही कोणतेही बंधन घातलेले नाही. मलायकाच्या कपड्यांचे मी नेहमीच समर्थन करत आलो आहे. कारण मला माहीत आहे की एखाद्याला एखादी गोष्ट करण्यापासून रोखले तर तो तेच काम सतत करतो. त्यामुळे मलायकाच्या फॅशन स्टाइलबद्दल मी कधीच काही बोललो नाही."
मलायका आणि अरबाज यांचे नाते तुटण्याचे कारण आजूनही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. पण दोघांमध्ये मतभिन्नता होती. यानंतर दोघेही वेगळे झाले.वर्ष 2017 मध्ये घटस्फोटानंतर मलायका अरोराने अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली. मलायका आणि अर्जुन यांना त्यांच्या वयातील अंतरामुळे अनेकवेळा ट्रोल देखील केलं जातं.
संबंधित बातम्या:
Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर