Khatija Rahman : दिग्गज संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांची मुलगी खतीजा रहमान (Khatija Rahman) हिचा गुरुवारी निकाह पार पडला. ए.आर. रहमानने स्वतः मुलीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खतीजाचे लग्न रियासदीन शेख मोहम्मद यांच्याशी झाले आहे. रहमानचा जावई रियान हा व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे. इंस्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेअर करताना एआर रहमानने लिहिले, ‘अल्लाह नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देवो, तुमच्या सर्व शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद." रहमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये रेहमानची पत्नी सायरा बानो, त्यांची मुले आमेन आणि रहीमा देखील दिसत आहेत. या फोटोत रहमानच्या आईचा फोटोही दिसत आहे.


ए.आर. रहमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये वधूच्या वेशात खतीजा दिसते आहे. खतीजा रियानजवळ बसली आहे. रहमानने आपल्या इंस्टाग्रामवर नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर केला आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत.


पाहा पोस्ट :



सोशल मीडियावर समोर आलेल्या खतीजाच्या लग्नाच्या फोटोमध्ये तिने हिजाब परिधान केलेला दिसत आहे. खतीजा आणि रियान त्यांच्या लग्नाच्या दिवशी पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. खतिजाने फुलांचा कुर्ता, तर रियानने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे.


वाढदिवसाचं निमित्त साधत केला साखरपुडा


खतीजाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याबद्दल माहिती दिली होती. तिने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, 'मला तुम्हा सर्वांना हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, रियासद्दीन शेख मोहम्मद यांच्यासोबत माझा साखरपुडा पार पडला आहे. रियासद्दीन हे ऑडिओ इंजिनिअर आहेत. रियासद्दीन आणि माझा साखरपुडा 29 डिसेंबरला पार पडला. माझे कुटुंब आणि मित्रमैत्रीणी या सोहळ्याला उपस्थित होते.'



हेही वाचा :


Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...


PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!


Jayeshbhai Jordaar Controversy : प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात! चित्रपटाविरोधात याचिका दाखल