A. R. Rahman: संगीत क्षेत्रामधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानचा (A. R. Rahman)  आज 56 वा वाढदिवस आहे. ए.आर.रहमान यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 


ए.आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे. हे नाव त्यांनी नंतर बदलले. एआर रहमान यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. ए आर रहमान यांना संगीताचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील आरके शेखर हे मल्याळम चित्रपटांमधील गाण्यांना संगीत द्यायचे. ए आर रहमान हे  मास्टर धनराज यांच्याकडून संगीतातील बारकावे शिकले.  लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शिष्यवृत्तीही मिळाली.  ए आर रहमान यांनी  Western classical music मध्ये डिप्लोमा केला.


हिट चित्रपटांमधील गाण्यांना दिलं संगीत


एआर रहमान यांनी 1992 मध्ये 'रोजा' चित्रपटात संगीत दिले. या चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली. तसेच त्यांनी 'दिल से', 'ख्वाजा मेरे ख्वाजा', 'जय हो''बॉम्बे', 'रंगीला', 'दिल से', 'ताल', 'जींस', 'पुकार', 'फिजा', 'लगान', 'स्वदेस', 'जोधा-अकबर', 'युवराज', 'स्लमडॉग मिलेनियर'  आणि 'मोहेंजो दारो' या चित्रपटांना संगीत दिलं. 






या पुरस्कारांनी करण्यात आलं सन्मानित


ए. आर. रहमान यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'स्लम डॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी त्यांना गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि ग्रॅमी यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटातील 'जय हो' हे गाणे देश-विदेशात खूप गाजले. ए.आर. रहमान यांनी हे गाणे अनेक कॉन्सर्टमध्ये गायले आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 5 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!