Tunisha Sharma : टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर तिचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान (Sheezan Khan) कोठडीत आहे. तुनिषाच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नुकतंच शिझानची बहीण फलक नाज आणि शिझानच्या आईने पत्रकार परिषद घेत तुनिषाच्या आईने शिझानवर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.


शिझानच्या कुटुंबियांनी सांगितले होते की, तुनिषाचे शिझानबरोबर प्रेमसंबंध होते. आता शिझानच्या कुटुंबियांकडून तुनिषा शर्माबरोबर व्हॉट्सअॅपवर झालेल्या संवादाची आणखी एक चॅट शेअर करण्यात आली आहे.


तुनिशा शिझानच्या आईवर विश्वास ठेवायची


6 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता तुनिषा शर्माने शीजानच्या आईला मेसेज केला की ती झोपली आहे का? ज्याचे उत्तर आले नाही. त्यानंतर तुनिषाने पुन्हा 12 ऑक्टोबर रोजी मेसेज केला. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, 


हे चॅट 12 ऑक्टोबरचे आहेत. ज्यामध्ये तुनिषाने शिझानच्या आईला मेसेज केला आहे की, 'जेव्हा कोणीही माझ्याबरोबर उभे नाही, तेव्हा मला माहित आहे की तुम्ही किंवा आपी (शिझानची बहिण) नेहमीच उभे राहतील. मी तुम्हा दोघींवर खूप प्रेम करते. काळजी करू नका सर्व काही ठीक होईल. मी तुमच्याबरोबर आहे. या मेसेजला उत्तर देताना शिझानची आई लिहिते की, 'बेटा तू नेहमी आनंदी राहा, तुझी तब्येत चांगली राहो, फक्त आमेन.' तुनिषा आणि शिझानच्या आईची ही चॅट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 




नेमकं प्रकरण काय? 


हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. वसई जवळच्या नायगावमध्ये अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तुनिषाच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


तुनिषा शर्माने शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तुनिशा आणि शिझान हे दोघे अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी शेअर केला होता. त्यामुळे सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषाने गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.


महत्त्वाच्या बातम्या : 


Tunisha Sharma: 'तुझी आठवण येते...'; तुनिषा शर्माच्या बर्थ-डेला शिझानच्या बहिणीनं शेअर केली पोस्ट