Anushka Shetty Wedding News :  'बाहुबली' चित्रपटातील देवसेनाम म्हणजे अभिनेत्री  अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) आता विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनुष्का शेट्टी आणि प्रभास (Prabhas) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होती. मात्र, प्रभास आणि अनुष्का यांच्या चाहत्यांना धक्का लागणार आहे. अनुष्का ही प्रभाससोबत विवाहबंधनात अडकणार नाही. अनुष्काने ही चित्रपट निर्मात्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांचाही साखरपुडा झाला असल्याचे वृत्त आहे. 


अनुष्का शेट्टी प्रभासला डेट करत असल्याची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होते. अनुष्का आणि प्रभास हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'बाहुबली' मालिकेत प्रभास आणि अनुष्काची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. इतकंच नव्हे तर त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सुरू झाल्यात. 






अनुष्काचा साखरपुडाही झाला आता अडकणार विवाहबंधनात... 


'न्यूज 9 लाइव्ह' च्या वृत्तानुसार, अनुष्का शर्माने एका कन्नड निर्मात्यासह साखरपुडा केला आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघेही विवाह बंधनात अडकतील असाही दावा या वृत्तात केला आहे. या वृत्ताबाबत अभिनेत्री अनुष्का शेट्टी अथवा तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अनुष्का शेट्टी आणि तिच्यासोबत साखरपुडा झालेल्या निर्मात्याचे वय देखील 42 असल्याचा दावा करण्यात आला आहे. 


प्रभाससोबतच्या डेटिंगवर काय म्हणाली होती अनुष्का?


प्रभास आणि अनुष्का हे दोघेही तेलगू चित्रपटात हिट जोडी समजली जाते. त्यांचे चाहतेदेखील रील लाईफची जोडी रिअल लाईफमध्ये असावी अशी इच्छा व्यक्त करतात. एका मुलाखतीत मात्र, अनुष्काने प्रभासला नेहमीच एक चांगला मित्र असल्याचे सांगितले. आम्ही दोघेही अविवाहित असल्याने आमच्या अफेअरच्या चर्चा होतात. मात्र, आमच्यात असे काहीच नसल्याचेही अनुष्काने एका मुलाखतीत म्हटले होते.