Anushka Sharma At Childhood Home:  अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) हे काही दिवसांपूर्वी उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या आवारातील विराट आणि अनुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता नुकतीच अनुष्कानं एक पोस्ट शेअर करुन मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) आठवणींना उजाळा दिला. अनुष्कानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली. अनुष्का बालपणी ज्या घरात राहात होती, त्या घराचे काही फोटो अनुष्कानं शेअर केले. 


अनुष्काची पोस्ट


अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मध्य प्रदेशमधील एमएचओडब्यू (डॉ अंबेडकर नगर) हा परिसर दिसत आहे. हे मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यातील एक शहर आहे.  या व्हिडीओमध्ये अनुष्का एका घराबाबत सांगताना दिसत आहे. या घरामध्ये अनुष्का बालपणी राहत होती.


अनुष्कानं डॉ. अंबेडकर नगरमधील एक व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मध्य प्रदेशमधील MHOW ला भेट दिली. ज्या ठिकाणी मी लहानपणी पहिल्यांदा पोहायला शिकले होतो, ही ती जागा जिथे,  मी माझ्या वडिलांसोबत स्कूटरवर फिरायचे. हे ठिकाण माझ्यासाठी अत्यंत खास आहे.' अनुष्कानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट केलं आहे. 


पाहा व्हिडीओ






अनुष्का रुपेरी पडद्यावर करणार पुनरागमन 


2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होती. अनुष्काने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्म यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने एनएच 10 आणि परी या चित्रपटांची देखील निर्मीती केली आहे. चकदा एक्सप्रेस या चित्रपटत अनुष्का क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Tripti Dimri-Karnesh Sharma: अनुष्का शर्माचा भाऊ 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? सोशल मीडियावर चर्चेला उधाण