Ranbir Kapoor: अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं तो सध्या प्रमोशन करत आहे. या चित्रपटात रणबीर हा  श्रद्धा कपूरसोबत (Shraddha Kapoor) स्क्रिन शेअर करणार आहे. रणबीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा अॅनिमल हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शूटिंग आणि चित्रपटांचे प्रमोशन या सगळ्यामधून ब्रेक घेऊन लवकरच रणबीर हा राहासोबत वेळ घालवणार आहे. 


रणबीर त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आणि संदीप वंगा रेड्डीज यांच्या अॅनिमलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणबीरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, त्याची मुलगी राहाच्या जन्मानंतर त्याला सुट्टीवर जायचे आहे आणि तो लवकरच मुलीसोबत वेळ घालण्यासाठी कामामधून ब्रेक घेणार आहे. याबाबत त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, "दोन महिन्यांनंतर मी सुट्टी घेत आहे. मी या सुट्टीची वाट बघत आहे.  मला असे वाटते की, माझ्याकडे पाच ते सहा महिने कोणतेही काम नसावे. ज्यामुळे मला मुलीसोबत वेळ घालवता येईल."


'एप्रिलच्या अखेरीस मी अॅनिमल चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करेन आणि नंतर मी माझ्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी मोठा ब्रेक घेईन' असंही रणबीरनं मुलाखतीमध्ये सांगितलं. 


रणबीर हा ब्रह्मास्त्र-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल झाले होते. ब्रम्हास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे. 


ब्रह्मास्त्र या चित्रपटातील देवा देवा आणि केसरिया या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ब्रह्मास्त्र-2 चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...