Anurag Kashyap : "मला विचित्र आणि विक्षिप्त लोक आवडतात", असं बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) म्हणाला आहे. दिग्दर्शकाच्या या वक्तव्याने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 'ब्लॅक फ्रायडे' (Black Friday),'गँग्स ऑफ वासेपुर' (Gangs of Wasseypur),'अग्ली' (Ugly) आणि 'देव डी' (Dev.D) अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा अनुराग कश्यप नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या इंस्टा स्टोरीमुळे अनुराग चर्चेत आला आहे. विचित्र लोक आवडतात,असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


अनुराग कश्यपची पोस्ट काय? (Anurag Kashyap Post) 


अनुराग कश्यपने @untamedhero ची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"मला विचित्र आणि विक्षिप्त लोक आणि कलाकार आवडतात. द ब्लॅक शीप असणारे हे असे लोक आहेत जे खरोखरच स्वार्थी आहेत. स्वत:च्या फायद्याचा फक्त विचार करतात. पण ज्या लोकांची विचारसरणी वेगळी असते त्यांचा आत्मा खरचं खूप सुंदर असतो".


 


अनुराग कश्यप याआधीदेखील आपल्या इंस्टा स्टोरीमुळे चर्चेत आला होता. त्याने लिहिलं होतं,"इंडस्ट्रीतील नवोदित मंडळींची मी भेट घेतली आहे. या लोकांकडे देण्यासारखं काही नाही. आता या नव्या लोकांना मला भेटण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या लोकांना मदत करण्यात माझा आयुष्यातील बराच वेळ वाया गेला आहे. पुढे या चर्चांमधून प्रोडक्टिव्ह असं काही निर्माण झालं नाही. आता मला वेळ वाया घालवायचा नाही. आता तुमच्यात दम असेल तर मला भेटण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील". 


आदेश बांदेकर पुढे म्हणाले,"10-15 मिनिटांसाठी जर कोणाला मला भेटायचं असेल तर त्यांना 1 लाख रुपये चार्ज करावे लागतील. अर्ध्या तासासाठी 2 लाख रुपये आणि एका तासासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील. आतापर्यंत माझा खूप वेळ वाया गेला आहे. त्यामुळे मला भेटण्यासाठी कृपया आता पैसे मोजण्याची तयारी ठेवा". 


अनुराग कश्यपबद्दल जाणून घ्या... (Who is Anurag Kashyap)


अनुराग कश्यप हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय सिने-दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अनुरागचा 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करताना तो दिसणार आहे. अजत अजय शर्माने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अनुरागच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Anurag Kashyap Banned Movie : मन सुन्न करणारा अन् थिएटरमध्ये बंदी आलेला, चार मित्रांची कुख्यात गोष्ट; ओटीटीवर पाहा अनुराग कश्यपचा चित्रपट