मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ट्विटर लोकांमध्ये शाब्दिक चकमकीचा आखाडा बनला आहे. दरम्यान, सध्या अभिनेता अनिल कपूर आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल कपूरने ट्विटरवर 'दिल्ली क्राईम'च्य टीमला शुभेच्छा दिल्या असून ते म्हणाले की, "मी हे याआधीही म्हणालो आहे आणि मी हे पुन्हा म्हणतोय कारण हे लोक डिझर्व्ह करतात! अभिनंदन #दिल्ली क्राइम टीम! चांगलं वाटतं जेव्हा आपल्या अनेक लोकांना आंतरराष्ट्रीय मंचावर ओळख मिळत @ShefaliShah_"





अनिल कपूर यांच्याया ट्वीटनंतर अनुराग कश्यपने थेट अनिल कपूर यांच्यावर टीकास्त्र डागलं. तो म्हणाला की, "चांगलं वाटतं जेव्हा काही डिझर्विंग लोकांना आंतरराष्ट्रीय मंचावर ओळख मिळते, बरं तुमचा ऑस्कर कुठे आहे? नाही मिळाला? अच्छा आणि नॉमिनेशन? अनुरागच्या या ट्वीटवर अनिल कपूर यांनीही उत्तर दिलं. ते म्हणाले की, "तू कदाचित सर्वात जवळून ऑस्कर तेव्हाच पाहिला असशील जेव्हा चित्रपट स्लमडॉगला टीव्हीवर ऑस्कर देण्यात आला होता. #तुमसे ना हो पायेगा"





अनिल कपूर यांचं उत्तर येताच अनुराग कश्पयने रागाच्या भरात अनिल कपूर यांना प्रत्युत्तर दिलं आणि स्लमडॉगमध्ये तुम्ही सेकेंड चॉईस असल्याचं सांगितलं. अनुराग म्हणाला की, हा चित्रपट सर्वात आधी शाहरुख खानला ऑफर करण्यात येणार होता, परंतु शाहरुखने नाही सांगितल्यावर अनिल कपूर यांना या चित्रपटात घेण्यात आलं होतं. अनुराग असं म्हटल्यावर अनिल कपूर यांनीही त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, "मला याचा फरक पडत नाही, काम काम असतं. तुझ्याप्रमाणे काम शोधताना केस ओढावे लागत नाही"







अनिल कपूर यांनी असं म्हटल्यावर पुन्हा एकदा त्यांना उत्तर देत अनुराग म्हणाला की, "सर, तुम्ही तर केसांबाबत बोलूच नका, तुम्हाला तर तुमच्या केसांमुळेच भूमिका मिळतात. #बालबालबालू #दजंगलीलाइफ."





एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करून झाल्यानंतर ही शाब्दिक चकमक एका गंभीर वळणावर जाते. जेव्हा अनिल कपूर ट्विटरवरच अनुरागसाठी लिहितात की, "बेटा माझ्यासारख्या करियरसाठी सीरियस स्किल्स पाहिजे, अशीच नाही चालली आमची गाडी 40 वर्षांपासून"





अनिल कपूर यांच्या ट्वीटवरही अनुराग शांत झाला नाही आणि पलटून उत्तर दिलं की, "सर प्रत्येक 40 वर्षांपूर्वीच्या गाडीला विंटेज कार म्हणत नाहीत, काही खटाराही असतात. #रिटायरमेंटकॉलिंग. अनुराग असं म्हणतातच राग अनावर झालेले अनिल कपूर म्हणाले की, "अरे माझी गाडी 40 वर्षांपासून चालली तर चालली, तुझी तर अद्याप गॅरेजमधूनही नाही निघाली."





दरम्यान, अनिल कपूरच्या या ट्वीटनंतर अनुरागने पुन्हा एकदा त्यांना उत्तर देताना लिहिलं की, "जर गाडी रेस 3 ची असेल तर चांगलंच आहे की, ती गॅरेजमध्येच राहावी." दरम्यान, अनिल कपूर आणि अनुराग कश्यप लवकरच चित्रपट AK vs AK मध्येही दिसून येणार आहेत.