Anupam Kher: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. आज त्यांचा 68 वा वाढदिवस आहे. अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च 1955 रोजी शिमला येथे झाला. अनुपम खेर यांनी जवळपास 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ते मुंबईत आले. पण मुंबईतील करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनुपम यांना खूप संघर्ष करावा लागला.
अनुपम यांची स्ट्रगल स्टोरी
अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी जेव्हा अनुपम हे मुंबईमध्ये आले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला. खिशात केवळ 37 रुपये घेऊन ते मुंबईमध्ये आलो होते. काही दिवस अनुपम यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपावं लागलं होतं, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. अनेक वेळा अनुपम यांच्याकडे जेवण करण्यासाठी देखील पैसे नव्हते. अनुपम खेर यांना 29 व्या वर्षी सारांश या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
महेश भट्ट यांच्यासोबत घेतला पंगा
सारांश या चित्रपटासाठी अनुपम यांचे महेश भट्ट यांच्यासोबत त्यांचे भांडण देखील झाले होते. महेश भट्ट यांची इच्छा होती की, सारांश चित्रपटामधील अनुपम यांना ऑफर करण्यात आलेली भूमिका संजीव कपूर यांनी करावी. कारण शोले, आंधी आणि मौसम यांसारख्या चित्रपटांमध्ये संजीव कपूर यांनी काम केलं. सारांश चित्रपटातील भूमिकेसाठी महेश भट्ट आणि अनुपम यांच्यामध्ये भांडण झालं. नंतर महेश भट्ट यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी अनुपम खेर यांना ही भूमिका परत दिली. या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. त्यानंतर अनुपम यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हिट चित्रपटांमध्ये केलं काम
सारांशनंतर 'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटातील अनुपम यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
अनुपम खेर आहेत कोट्यवधींचे मालक
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अनुपम हे 400 कोटींच्या संपत्तींचे मालक आहेत. मुंबईमध्ये त्यांचे दोन बंगले आहेत. तसेच त्यांच्याकडे काही लग्झरी गाड्या देखील आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: