Panchahattar ka Chora : 'पचहत्तर का छोरा' (Panchahattar Ka Chora) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नीना गुप्ता (Neena Gupta) आणि रणदीप हुड्डाची (Randeep Hooda) जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तसेच संजय मिश्रा आणि गुलशन ग्रोवरदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 


'पचहत्तर का छोरा' या सिनेमाचं शूटिंग राजस्थानमधील राजसमंद याठिकाणी झालं आहे. जयंत गिलातरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'डी', 'साहेब बीवी और गैंगस्टार', मैं और चाचर्ल्स', 'सरबजीत', 'लाल रंग', 'एक्सट्रॅक्शन' सारख्या सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवलेला रणदीप हुड्डा या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. तर दुसरीकडे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ करणारी नीना गुप्तादेखील या सिनेमात झळकणार आहे. 


'पचहत्तर का छोरा'बद्दल रणदीप हुड्डा म्हणाला... (Randeep Hooda Shared Panchahattar ka Chora Poster)


'पचहत्तर का छोरा' या सिनेमाबद्दल बोलताना रणदीप हुड्डा म्हणाला,'पचहत्तर का छोरा' या सिनेमातील माझं पात्र आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. रोमॅंटिक नाट्य असणाऱ्या या सिनेमात विनोदाची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हसवण्यासोबत विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा आहे. एक वेगळी प्रेमकथा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 






'पचहत्तर का छोरा'बद्दल बोलताना दिग्दर्शन जयंत गिलातर (Jayant Gilatar) म्हणाला, "वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे दिग्दर्शित करायला मला आवडतं. 'पचहत्तर का छोरा' या सिनेमाचा विषयदेखील वेगळा आहे. या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. तसेच माझ्या या सिनेमात रणदीप हुड्डा आणि नीना गुप्तासारखे कलाकार झळकणार असल्याचा आनंद वेगळाच आहे".


जेजे क्रिएशन्स एलएलपी आणि शिवम सिनेमा विजनच्या बॅनरखाली 'पचहत्तर का छोरा' (Panchahattar ka Chora) या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 'पचहत्तर का छोरा' या सिनेमाच्या पोस्टरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 06 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!