Bipin Rawat Demise : भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, अभिनेत्री कंगना राणौत, कमल हासन तसेच इतर कलाकारांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. 


लता मंगेशकरांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे, "हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. भारतमातेच्या या शूर सुपुत्रांना मी श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे".






साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी रावत यांचा एक फोटो शेअर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,"आम्ही हात जोडून मनापासून शोक व्यक्त करतो".
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. कंगनाने लिहिले आहे, "या वर्षातील सर्वात भयानक बातमी. राष्ट्रसेवेबद्दल जनरल रावत यांचे राष्ट्र सदैव ऋणी राहील.ओम शांती. जय हिंद."






संबंधित बातम्या


Bipin Rawat Helicopter Crash : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन


Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!


Bipin Rawat : बिपीन रावत यांना शिवाजी महाराजांबद्दल नितांत अभिमान; 2018 सालच्या दिल्लीतील शिवजयंतीला उपस्थिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha