Animal Box Office Collection Day 9 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. रिलीजच्या नऊ दिवसांत जगभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमाचा जगभरात बोलबाला आहे. या सिनेमाने प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवली आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित हा सिनेमा ओपनिंग डेपासून आपला जलवा दाखवत आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाचे अनेक शो हाऊसफुल होत आहेत.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection Day 9)
'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'अॅनिमल'ने 63.8 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटी, आठव्या दिवशी 22.95 कोटी आणि नवव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने 398.53 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 600 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस : 63.8 कोटी
दुसरा दिवस : 66.27 कोटी
तिसरा दिवस : 71.46 कोटी
चौथा दिवस : 43.96 कोटी
पाचवा दिवस : 37.47 कोटी
सहावा दिवस : 30.39 कोटी
सातवा दिवस : 24.23 कोटी
आठवा दिवस : 22.95 कोटी
नऊवा दिवस : 37 कोटी
एकूण कमाई : 398.53 कोटी
'अॅनिमल' सिनेमाने रिलीजच्या नऊ दिवसांतच इतिहास रचला आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 63 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 'अॅनिमल'ने 338.85 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या नवव्या दिवशी या सिनेमाने 37 कोटींचा गल्ला जमवला आहे.
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमाची विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या सिनेमासोबत टक्कर होत आहे. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रसिताद मिळत आहे. पण कमाईच्या बाबतीत रणबीरच्या 'अॅनिमल'ने बाजी मारली आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. रणबीरसह या सिनेमातील बॉबी देओलच्या कामाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. आता चाहत्यांना 'अॅनिमल 2'ची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या